भोसे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेसाठी २९लाख रूपये निधी मंजूर. आ. समाधान आवताडे.


 भोसे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी टंचाई मधून२९ लाख रुपये मंजूर - आ आवताडे


प्रतिनिधी,पंढरपुर_

मंगळवेढा तालुक्यातील भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी टंचाई आराखडयामधून २९ लाख ४९ हजार ७९२ रुपये मंजूर केले असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली.

सदर योजनेच्या दुरुस्तीसाठी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात त्यांनी असे म्हटले आहे की मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात कायमस्वरूपी दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेद्वारेच या भागाची तहान भागत आहे परंतु या योजनेचे काम अतिशय निकृष्ट झाल्याने लोकांना पिण्यासाठी व्यवस्थित पाणी मिळत नाही सध्या या भागातील बोर विहिरींच्या पाण्याची पातळी खोलवर गेली असल्यामुळे दुसरा पाण्याचा स्त्रोत नाही त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी खूप हाल होत आहेत या योजनेत असणाऱ्या गावांना टँकरही दिले जात नाहीत त्यामुळे तात्काळ या योजनेच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा तसेच ज्या ठिकाणी ही योजना पोहोचली नाही त्या वाड्या वस्त्यांवर टँकर मंजूर करावा अशी मागणी आमदार समाधान आवताडे यांनी पत्राद्वारे केली होती त्यानुसार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी २९ लाख ४९ हजार ७९२रुपये मंजूर केले असून कार्यरंभ आदेशानंतर 

 दिवसात काम पूर्ण करण्याचा सूचना प्रशासनास दिले आहेत.

 या मंजूर रकमेमधून लिकेजेस काढणे, पाण्याची गळती कमी करणे,पाईप दुरुस्ती करणे,इयर वॉल बदलणे, ही कामे करण्यात येणार आहेत त्याचबरोबर ही कामे करत असताना सदर काम व्यवस्थित करून घेण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेची असून या योजनांची पाहणी उपविभागीय अधिकारी, संबंधित गटविकास अधिकारी व तहसीलदार यांनी स्वतः जाऊन करून काम व्यवस्थित व चांगल्या दर्जाचे करून घ्यायचा सूचना त्यांना दिल्या आहेत.

  सध्या उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे तीव्र पाणीटंचाई भासत असून हा निधी मंजूर झाल्यामुळे लवकरच या योजनेची दुरुस्ती होऊन व्यवस्थित पाणी मिळेल असे आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.