पती पत्नी यांच्या भांडणात पडला, अन जीव गमावून बसला.
पती पत्नी च्या भांडणात मध्ये पडल्याने कोयत्याने वार करुन एकाची हत्या,
नारायण चिंचोली येथील घटनेने तालुका हादरला.
प्रतिनिधि पंढरपूर -पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथे पती पत्नीचे भांडण सुरू असताना ते सोडविण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा पतीने कोयत्याने कमरेवर आणि डोक्यावर गंभीर वार करुन त्याची हत्या केली.
याबाबत पंढरपूर शहर पोलिस ठाण्याकडून समजलेल्या माहितीनुसार गुरुवार दिनांक २१मार्च रोजी सकाळी ८: ४०वा नारायण चिंचोली येथे आपल्या राहत्या घरासमोर परमेश्वर गाडे हा आपल्या पत्नीशी वाद घालून जोरजोरात भांडत होता.
हे पाहून त्याचा मित्र व शेजारी असणारा संतोष नाना चौगुले (वय४४, नारायण चिंचोली) हा हे भांडण सोडविण्यासाठी गेला असता , चिडलेल्या परमेश्वर याने तू आमच्या भांडणात का मध्ये येतो, असे म्हणून कोयत्याने संतोष याच्या कमरेवर आणि डोक्यात गंभीर वार करुन जखमी केले.
या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
पंढरपूर तालुका पोलिसांनी परमेश्वर गाडे यास ताब्यात घेतले असून कसून चौकशी करण्यात येत आहे.
स पो नि विश्वास पाटील तपास करीत आहेत.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment