पंढरीत डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जयंती साजरी.
पंढरीत डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जयंती साजरी.
प्रतिनिधी पंढरपूर -रविवार दिनांक १२फेब्रुवारी रोजी भारतीय जनसंघाचे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त दि पंढरपूर अर्बन बँकेच्या प्रशासकीय भवनात लोकसभेचे सांगली माढा विभागाचे क्लस्टर प्रमुख आदरणीय प्रशांत मालक परिचारक यांच्या हस्ते शामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम झाला यावेळी बोलताना आदरणीय प्रशांत मालक परिचारक असे म्हणाले,की, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांची साधीराने आणि उच्च विचारसरणी आणि धर्मग्रंथांच्या अभ्यास आणि तात्विक चिंतनातून आणि मननातून त्यांनी एकात्मक मानववाद हा सिद्धांत मांडून भारतीय समाजाला दिशा देण्यात काम केलं आणि त्यांच्या कामाची प्रेरणा ही भारतातल्या प्रत्येक नागरिकांमध्ये ऊर्जा उत्पन्न करण्याचे काम करतं असं प्रतिपादन प्रशांत परिचारक यांनी केलं सदरील कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा डॉ प्राजक्ता बेणारे,उपाध्यक्षा सौ अपर्णा तारके, माजी नगरसेविका,शकुंतला नडगिरे, नगरसेवक, अनिल अभंगराव, चेअरमन सतीश मुळे, पंडित राव भोसले, तालुकाध्यक्ष भास्कर दादा कस गावडे, ऍडव्होकेट ओंकार जोशी, धीरजम्हमाणे, संदीप माने राजू कौलवार चांगदेव कांबळे सुरेश खिस्ते सचिता सगर व असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment