रब्बी पिकांसाठी उद्यापासून पाणी सोडण्यात येणार, अभिजीत पाटील यांच्या मागणीला यश.
शेतकरी बांधवांसाठी दिलासादायक.. रब्बी पिकांसाठी उद्यापासून पाणी उपलब्ध होणार..
पंढरपूर (प्रतिनिधी)
सन २०२३-२०२४ मधील उपलब्ध पाण्याचे आज दुपारी कालवा सल्लागार समितीची पालकमंत्री ना.श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारा रब्बी पिकांसाठी उजनी कालवा पाणी नियोजन संदर्भात बैठक संपन्न झाली. शेतकरी बांधवांच्या पिकांची परिस्थिती लक्षात घेऊन तत्काळ पाणी सोडण्याची विनंती श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. श्री. अभिजीत (आबा) पाटील यांनी या बैठकीत केली. तसेच कालवा वरील सीआर भरुन द्यावे, तसेच पाणी सोडल्यावर वीज खंडित करू नये, अशा महत्त्वपूर्ण सुचना मांडल्या.
परिणामतः उद्या सकाळपासून उजनी उजवा व डावा कालवा तसेच बोगद्यातून पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. शेतकरी बांधवांसाठी हा निर्णय निश्चितच लाभदायक ठरेल.
यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता, सोलापूर जिल्ह्याचे सर्व आमदार, विविध पदाधिकारी व इतर विभागातील प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
संपादक.
चैतन्य उत्पात.
मो.९४०३८७३५२३.
९२२६२८२००५.

Comments
Post a Comment