पंढरीत जागतिक मराठी रंगभूमी दीन साजरा.


 पंढरपूरकरमध्ये   जागतिक मराठी रंगभूमी दिन  साजरा.

प्रतिनिधी. पंढरपूर -पंढरपूर कलावंत आणि पंढरपूर नाट्य परिषद शाखा यांच्या वतीने अतिशय उत्साहात आणि आनंदात रविवार दि ५ रोजी संपन्न झाला. विवेक प्राथमिक विद्यालयाच्या पटांगणावर संपन्न झालेल्या या रंगारंग कार्यक्रमाला पंढरपूरातील कलावंतांनी बहारदार सादरीकरण करून आणि  रसिकांनी तुफान दाद देऊन रंगत आणली.  राष्ट्रीय भारूडकार  चंदाताई तिवाडी , जेष्ठ रंगकर्मी विनय बडवे , नाट्य परिषद पंढरपूर चे अध्यक्ष डाॅ. मंदार सोनवणे , अ. भा. नाट्य परिषद नियामक सदस्य दिलीप कोरके , लावणीकार  मनोहर उर्फ छबूराव ऊत्पात , विनोद शेंडगे , राजूभाऊ उराडे यांच्यासह पंढरपूरातील जेष्ठ.. नवोदित रंगकर्मीची या प्रसंगी उपस्थिती होती. 

तात्या देवकते , दत्तात्रय जगताप, डॉ .प्राजक्ता बेणारे , रविंद्र शेवडे , अल्फिया मुलाणी , सिमा माने आदींनी गीत गायन करून वातावरण सुरेल बनवले तर विनय महाराज बडवे , गणेश गोडबोले , श्याम सावजी , सौ. पद्मा सावजी , निर्मला भिंगे आदींनी अभिनय सादरीकरण केले. छबूराव उत्पात यांनी लावणी गायन करून तर चंदाताई तिवाडी यांनी काव्य सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. 

हरि बरंगुळे यांनी भन्नाट लावणी सादरीकरण करून रसिकांना अक्षरशः नाचायला लावले.  संध्या साखी यांनी भारूड सादर केले. श्री अकॅडमीतर्फे नृत्य सादरीकरण करण्यात आले. 

या प्रसंगी विनोद शेंडगे यांना शिवरंजन कलारंजनी पुरस्कार मिळाल्याबद्दल सपत्नीक सत्कार करण्यात आला. 

भैया फुगारे , परशुराम पवार,अभि गोडबोले आदींसह इतरांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

संपादक.

चैतन्य उत्पात.

मो.९४०३८७३५२३.

९२२६२८२००५.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.