पंडित विनोद शेंडगे यांच्या हातून उत्तम संगीतसेवा घडावी . प्राचार्य कैलाशजी कारंडे.


 *पंडीत विनोद शेंडगे यांच्या हातून उत्तम संगीत घडावी.*

*मा. प्राचार्य डॉ. कैलासजी करांडे*

प्रतिनिधी. पंढरपूर -  पंढरपूर येथे आज पंडीत विनोदजी शेंडगे यांना सोलापूर येथे शिवरंजनी कला गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले होते.  त्याबद्दल डॉ. कैलाशजी करांडे यांच्या शुभहस्ते विनोदजी शेंडगे यांच्या सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी ते बोलत होते.  

              कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कलासाधना सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष, श्रीकांत बडवे महाजन होते.   महाजन आपल्या भाषणात म्हणाले की, पंडीत विनोदजी यांनी संगीत क्षेत्रात दिलेले योगदान हे खूप महत्वपूर्ण आहे. पंढरपूरात 'अनाहत' या पहिल्या ऑडिओ स्टुडिओची निर्मिती त्यांनी केली. तसेच बडोद्याला पं. नारायणराव विनायकराव पटवर्धन यांचेकडे गुरुगृही राहून गुरुकुल पध्दतीने संगीताची आराधना करून विशारद  ही संगितातील महत्वपूर्ण पदवी प्राप्त करणारे विनोदी एकमेव पंढरीतील पंडीतजी आहेत.

              या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश मोरे गुरुजी यांनी केले तर अमरसिंह चव्हाण सर, रणजीत मोरे, राजेंद्र माळी यांची समयोचित भाषणे झाली.  हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ किरण बहिरवाडे, प्रा. राजेंद्र मोरे, अक्षय बडवे, राजकुमार शहा, राजकुमार आटकळे, महेश अंबिके,  सचिन भिंगे, राहुल सिद्धेवाडकर,अभिजीत देशापांडे. यांनी विशेष परिश्रम घेतले.

या कार्यक्रमास पंढरपूर येथील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.