सिद्धहस्त लेखिका, प्रवचनकार श्रीमती मानसीताई केसकर यांचे निधन.
सिध्दहस्त लेखिका,प्रवचनकार श्रीमती मानसीताई केसकर यांचे निधन
पंढरपूर दि. १३ -(प्रतिनिधी )सिद्धहस्त लेखिका, पंढरपुरातील ज्येष्ठ महिला विचारवंत, प्रवचनकार, व्याख्यात्या, महिला पत्रकार, ज्येष्ठ मुद्रिका, श्रीमती मानसी मार्तंड केसकर यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.
मानसी केसकर यांनी अनेक वर्षे पंढरी प्रसाद हे साप्ताहिक चालविले. एकुलता एक सुपुत्र मंदार यास उत्तम संस्कार करून सर्व व्यवहारात पारंगत केले.
सा. गोफण व केसकर कुटुंबियांच्या अतूट नाते होते.
त्यांची अंत्ययात्रा शांकुतल नगर इसबावी येथील राहते घरापासून दुपारी १ वाजता निघेल. योगीराज ऑफसेटचे श्री. मंदार केसकर यांच्या त्या मातोश्री होत. कैलासवासी प्रकाश दादा उत्पात, किशोर उत्पात यांचे बहीण भावाचे ऋणानुबंध अनेक वर्षांचे होते.
. मानसीताईंचा अध्यात्माचा गाढा अभ्यास होता. श्रीज्ञानेश्वर मंदिरात होणाऱ्या हरिनाम सप्ताह त्या नेहमीच सहभागी असत. त्यांनी गेली अनेक वर्षे नारी तू नारायणी या सदरातून अनेक अपरिचित महिला संतांची उकल करून नवीन पिढीसाठी त्यांची वेगळी ओळख आपल्या लेखणीतून त्यांनी करून दिली. जिल्ह्यातील अनेक वृत्तपत्रातून त्यांनी अध्यात्माचे लिखाण त्यांनी केले.
त्यांचे पश्चात दिर, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. गोफण परिवार केसकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो ही श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी प्रार्थना.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment