पंढरपूर तालुक्यातील ४० हजार ६९२ लोकांना मिळणार यंदाच्या दिवाळीत आनंदाचा शिधा.
तालुक्यातील ४० हजार ६९२ जणांना मिळणार यंदाच्या दिवाळीत 'आनंदाचा शिधा '
पंढरपूर-( प्रतिनिधी):- गतवर्षीप्रमाणे यंदा देखील तालुक्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना शासनाच्या वतीने दिवाळीत ‘आनंदाचा शिधा’ दिला जाणार आहे. यामध्ये रवा, साखर, तेल, चणाडाळ, मैदा व पोहा या सहा वस्तूंचा समावेश असून, तालुक्यातील ४० हजार ६९२इतक्या पात्र कार्डधारकांना ‘आनंदाचा शिधा’ मिळणार असल्याची माहिती तहसिलदार सुशील बेल्हेकर यांनी दिली.
गतवर्षी ‘आनंदाचा शिधा’ या संचात रवा, चनाडाळ, साखर आणि खाद्यतेल असे 4 जिन्नस होते. मात्र आता यामध्ये दोन जिन्नसांची म्हणजेच मैदा आणि पोहा यांची भर पडली आहे. अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेद्वारे शिधापत्रिकाधारकांना दिवाळीनिमित्त एक किलो साखर, एक लिटर तेल, प्रत्येकी अर्धा किलो रवा, चणाडाळ, मैदा व पोहा असे सहा शिधा जिन्नस समाविष्ट असलेला ‘आनंदाचा शिधा’ हा प्रतिसंच १००रुपये दरात ई- पॉस प्रणालीद्वारे वितरित करण्यात येणार आहे. हा शिधा तालुक्यातील ४० हजार ६९२इतक्या पात्र कार्डधारकांना सवलतीच्या दरात दिपावलीसणा अगोदर वाटप केला जाणार असल्याचे तहसिलदार बेल्हेकर यांनी सांगितले.
तालुक्यातील१४६ रास्त भाव धान्य दुकानदारांकडून मोफत धान्य वाटप करण्यात येणार असून, रास्त भाव धान्य दुकानदारांकडून पात्र शिधापत्रिकाधारकांना योग्य पध्दतीने 'आनंदाचा शिधा ' वाटप करण्यात येणार असल्याचे पुरवठा निरिक्षक सदानंद नाईक यांनी सांगितले आहे.
संपादक.
चैतन्य उत्पात.
मो.९४०३८७३५२३.
९२२६२८२००५.

Comments
Post a Comment