कार्तिकी वारी नियोजनासाठी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील दि ३ नोव्हेंबर रोजी घेणार आढावा बैठक.


 पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी  कार्तिकी यात्रा नियोजनाचा दुरदृष्य प्रणालीद्वारे घेतला आढावा. 

पंढरपूर येथे ३ नोव्हेंबर रोजी संभाव्य दौऱ्याप्रसंगी आढावा बैठक घेण्यात येणार

  पंढरपूर (प्रतिनिधी) :- कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. कार्तिकी शुध्द एकादशी गुरूवार, दिनांक २३नोव्हेंबर, २०२३रोजी असून, यात्रा कालावधी दि.२४ते २७ नोव्हेंबर असा राहणार आहे. या यात्रा कालावधीत सुमारे २० ते १२लाख वारकरी, भाविक येतात. येणाऱ्या भाविकांना सुरक्षा व आवश्यक सोयी सुविधांच्या उपलब्धता च्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन व मंदिरे समितीने केलेल्या नियोजनाचा आढावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दुरदृष्य प्रणालीद्वारे आज घेतला.

      यावेळी प्रांताधिकारी गजानन गुरव, मंदीर समितीचे  कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके दुरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. 

      यावेळी कार्तिकी यात्रेच्या अनुषंगाने मंदीर समिती व प्रशासनाकडून वारकरी भाविकांना देण्यात येणा-या सोयी सुविधांबाबत केलेल्या नियोजनाची सविस्तर माहिती पालकमंत्री पाटील यांनी जाणून घेतली. यात्रेसाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला शासनाकडून चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात. दर्शन रांग, दर्शन मंडप या ठिकाणी गर्दी होणार नाही यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी. पोलीस विभागाने वाहतुकीचे योग्य नियोजन करावे. तसेच भाविकांच्या वाहनासाठी पार्किंगची व्यवस्था चांगल्या पद्धतीने करावी. भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस विभागाने चोख बंदोबस्त ठेवावा. जिल्हा परिषद यंत्रणेने ग्रामीण भागात वारकऱ्यांसाठी त्यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या सर्व सोयी सुविधा अत्यंत काटेकोरपणे दिल्या जातील याची दक्षता घ्यावी. तसेच पोलीस मदत केंद्र ही ठिकठिकाणी सुरू ठेवावेत. पिण्याचे पाणी स्वच्छता व आरोग्य सुविधा भाविकांना उत्कृष्ट मिळाव्यात यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

      दि.३नोव्हेंबर  २०२३ रोजी च्या आपल्या संभाव्य पंढरपूर दौऱ्यात कार्तिकी वारीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन व मंदिर समितीने केलेल्या नियोजनाचा आढावा घेण्यात येणार असून पंढरपूर शहरात व  ग्रामीण भागात भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सर्व सोयी सुविधांची प्रत्यक्ष जागेवर जावून पाहणी करण्यात येईल, त्या अनुषंगाने प्रशासनाने तयारी ठेवावी अशीही सूचना यावेळी पालकमंत्री पाटील यांनी केली.

        वारीसाठी नियुक्ती केलेले इन्सिडेंट कमांडर तथा प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी प्रशासनाच्या वतीने तर मंदिर समितीच्या वतीने भाविकासाठी देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी पालकमंत्री महोदयांना दिली.

संपादक.

चैतन्य उत्पात.

मो.९४०३८७३५२३.

९२२६२८२००५.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.