कौठाळी येथे शॉर्ट सर्किटमुळे १७ एकर ऊस जळाला
*कौठाळी येथे शाॅर्ट सर्किटमुळे १७एकर ऊस जळाला
पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर तालुक्यातील कौठाळी येथे ५ आँक्टोबर रोजी अकरा शेतकऱ्यांचा एकूण १७ एकर ऊस शॉर्टसर्किटमुळे जळाला आहे.
एम एस ई बी अधिकाऱ्यांच्या हल गर्जीपणामुळे ऊस जळाल्यामुळे शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी पसरली आहे.
धुळा विठ्ठल वाघमोडे यांचा तीन एकर ऊस, सुरेखा अण्णा वाघमोडे यांचा दीड एकर ऊस, सदाशिव रामचंद्र धुमाळ यांचा दीड एकर ऊस, गणपत रामचंद्र धुमाळ यांचा दीड एकर , विनायक मारुती साबळे यांचा एक एकर, चंद्रकांत अण्णा देशमुख यांचा एक एकर,अंकुश अण्णा देशमुख यांचा दीड एकर, सोमनाथ ज्ञानेश्वर धुमाळ यांचा दीड एकर,प्रज्ञाराणी दत्तात्रय लोखंडे यांचा एक एकर, बंडू वसंत धुमाळ यांचा एक एकर, पांडुरंग लोखंडे यांचा एक एकर ऊस अशा एकूण ११ शेतकऱ्यांचा १७ एकर ऊस जळून शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्या मुळे शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी पसरली आहे. संबंधीत शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळावी म्हणून पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे. कौठाळी गावात यापूर्वी ही एम एस ई बी अधिकाऱ्यांच्या हलगर्जी पणामुळे शॉर्ट सर्किट होऊन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. संबंधित अधिकाऱ्याने याकडे लक्ष देऊन तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन आटकळे यांनी केलीआहे.
संपादक.
चैतन्य उत्पात.
मो.९४०३८७३५२३.
९२२६२८२००५.

Comments
Post a Comment