भारतीय परंपरेचा ऱ्हास रोखण्यासाठी पुणे ते पंढरपूर सायकल वारी.


 भारतीय परंपरा चा ऱ्हास रोखण्यासाठी पुणे ते पंढरपूर, सायकल वारी.

प्रतिनिधी. पंढरपूर -धार्मिक कार्यक्रम हिंदूच्या विविध सण, उत्सवात परंपरा जपण्याचा नावाखाली होणारे बीभत्स प्रकार व संस्कृतीचा ऱ्हास रोखण्यासाठी पुणे ते पंढरपूर, पंढरीची वारी, सायकल वारी, हा अभिनव उपक्रम घेण्यात आला.

भारतीय संस्कृतीच्या रक्षणासाठी दि २१ ऑक्टोबर रोजी पहाटे पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरापासून या सायकल वारी ची सुरुवात झाली.

यावेळी नंदकुमार एकबोटे, ह भ प निंबाळकर महाराज उपस्थित होते.

पुणे ते पंढरपूर या अंतरा दरम्यान वारी मार्गावर येणाऱ्या सर्व गावात थांबून भारतीय सण, परंपरा उत्सवांचे विकृतीकरण थांबविण्यासाठी जनजागृती करण्यात आली.

या काही वर्षात हिंदू सण परंपरा साजरे करताना अनेक गैरप्रकार घडताना दिसत आहेत. दहीहंडी उत्सवात तोकड्या कपड्यातील मुलींचा नंगानाच, अश्लील शब्द असलेली हिंदी गाणी,गणेशोत्सवात दारू पिऊन बीभत्स नाच, मोठ्या आवाजातील डॉल्बी स्टिरीओ असे  अनेक गैरप्रकार होत आहेत.

महापुरुषांच्या  जयंतीत  डॉल्बीवरील  कर्णकर्कश  संगीताने पंढरपूर येथील दोन युवकांचा हृदयविकाराचा झ्टका येऊन  मृत्यू झाला होता.

पुणे येथे संगीताच्या तालावर पडणाऱ्या निळ्या लाईटमुळे एका युवकास कायमचे अंधत्व आले आहे. असे गैरप्रकार रोखण्यासाठी ही सायकल वारी प्रबोधनात्मक ठरली.

यामध्ये प्रा. संदीप पवार, प्रा सुभाष बापट, देविदास चव्हाण, शुभम जाधव, सौरव दीक्षित, प्रणव खानविलकर, आदेश यादव, चंद्रकांत गावडे, महेश शिंदे, वेदांत दाभोळकर, सोहम उंदरे हे सहभागी झाले होते.

सोमवार दि २३ ऑक्टोबर रोजी पहाटे दोन वाजता पुण्यातील हे सायकलस्वार पंढरपूर येथे पहाटे दोन वाजता पोहोचले.

यावेळी भारतीय सण,उत्सव,परंपरा जपण्यासाठी सर्वांना बुध्दी देवोअसे साकडे श्री विठुरायाच्या चरणी मागितले.

संपादक.

चैतन्य उत्पात.

मो.९४०३८७३५२३.

९२२६२८२००५.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.