सौ लक्ष्मी बडवे संचालित नटराज भरतनाट्यम यांच्या वतीने वसुधैव कुटुंबकम, शास्त्रीय नृत्याविष्कार.
सौ. लक्ष्मी बडवे संचलीत नटराज भरतनाट्यम क्लासेसच्या वतीने "
वसुधैव कुटुंबकम"या शास्त्रीय नृत्याविष्कार कार्यक्रम संपन्न.
पंढरपूर (प्रतिनिधी)
शारदीय नवरात्रौत्सव औचित्य साधून प्रतिवर्षी प्रमाणेच याहीवर्षी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सहकार्याने सौ. लक्ष्मीताई बडवे यांच्या वतीने वसुधैव कुटुंबकम हा शास्त्रीय नृत्य कलाविष्कार तुकाराम भवन येथे संपन्न झाला.
सुरुवातीला पंढरीतील नामवंत स्त्री रोग तज्ञ डॉ. वर्षाताई काणे, डॉक्टर प्रसाद कुलकर्णी, अभिनेते व कलासाधना सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत महाजन बडवे व नटराज भरतनाट्य क्लासेसच्या संस्थापिका लक्ष्मीताई बडवे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
गणेश वंदना या नृत्याविष्काराने सुरु झालेल्या या कार्यक्रमात अनेक कलाविष्कार सादर झाले. त्यापैकी पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे, स्त्री शक्तीचा आलेख मांडणारा वंदेमातरम तर जातीपातींच्या पेक्षा राष्ट्र मोठे हे सांगणारा माणसानी माणसाशी माणसासम वागणे या कलाविष्कारांना रसीक प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या कलाविष्कारात कु. जान्हवी पुजारी व तेजल भट्टड यांनी आपल्या अप्रतीम मुद्राभिनयाने रसीक प्रेक्षकांची प्रचंड टाळ्यांच्या वर्षावात दाद मिळवली. या कार्यक्रमात एकुण लहान मोठ्या मिळून ५० कलाकारांनी आपली कला सादर केली. अविरतपणे सलग १७वर्षे सौ. लक्ष्मीताई यांनी हा नृत्य यज्ञ सुरु ठेवल्या बद्दल श्रीकांत महाजन यांनी बडवे मॅडमने विशेष कौतुक केले. डॉ काणे, कुलकर्णी व महाजन यांची यथोचित भाषणे झाली.
या कार्यक्रमास परिसरातील रसिकांनी प्रचंड गर्दी केली होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नारायण बडवे, उन्मेश बडवे, माऊली दुधाने, मंदिर समितीचे राजाभाऊ कुलकर्णी, सुधीर घोडके, सौ. मृणाल बडवे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पुजारी मॅडम यांनी केले तर आभार सौ. लक्ष्मीताई बडवे यांनी मानले.
संपादक.
चैतन्य उत्पात.
मो.९४०३८७३५२३.
९२२६२८२००५.

Comments
Post a Comment