राज्य उत्पादन शुल्क विभागाची हातभट्टी दारूच्या अड्ड्यांवर कारवाई, सव्वा नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त.
*राज्य उत्पादन शुल्क विभागाचे हातभट्ट्यांवर जिल्हाभरात छापे* दोन मोटरसायकलींसह सव्वा नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त. प्रतिनिधी पंढरपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी जिल्हाभरात राबविलेल्या मोहिमेत हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणांवर धडक कारवाई करत वीस गुन्ह्यात 520 लिटर हातभट्टी दारू, 21 हजार 280 लिटर रसायनासह दोन वाहने असा नऊ लाख 18 हजार 602 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारू निर्मिती व विक्री ठिकाणांवर सातत्याने कारवाई करण्यात येत असून शनिवारी राबविलेल्या विशेष मोहिमेत जिल्हाभरातील हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्या. भरारी पथकाने सोलापूर शहरातील बेडरपूल हद्दीत अर्जुन प्रकाश जाधव वय 23 वर्षे राहणार मुळेगाव तांडा याला मोटरसायकल क्रमांक MH13 CN 4511 वरून मध्ये शंभर लिटर दारूची वाहतूक करताना पकडले. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी मुळेगाव तांडा येथे सामूहिक छापा टाकला असता त्या ठिकाणी सुरू असलेल्या हातभट्टी ठिकाणांवरून चौदा हजार चारशे लिटर रसायन जप्त करून जागीच नाश करण्यात आले. प्रभारी निरीक्...