वारकरी संप्रदाय यांच्या बरोबर झालेल्या बैठकीत कॉरिडॉर प्रकल्पास कडाडून विरोध.
वारकरी संप्रदायाच्या बैठकीत महाराज मंडळींचा कॉरिडॉर प्रकल्पास कडाडून विरोध,
सुवर्णमध्य काढण्यासाठी अभ्यास कृती समिती नेमण्याची मागणी.
पंढरपूर(प्रतिनिधी )
_
पंढरपूर येथील संभाव्य कॉरिडॉर प्रकल्प चांगलाच वादग्रस्त झाला असून मंगळवार दि१२रोजी पंढरपूर येथील केबिपी कॉलेज मध्ये झालेल्या जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत महाराज मंडळीसह नागरिकांनी कडाडून विरोध केला.
सर्व वारकरी संप्रदाय महाराज मंडळींनी सध्याच्या प्रस्तावित विकास आराखड्यातील उद्धस्तीकरणाला ठाम विरोध दर्शविला. त्यांनी दिलेल्या सुचनांचे दिलेल्या भुवैकुंठ विकास आराखड्याचे काय झाले हा प्रतिप्रश्न करण्यात आला.
नागरीकांसोबतच माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी लोकांची घरेदारे पाडून काॅरीडाॅर करण्याऐवजी नेमकं काय कारणं गरजेचे आहे हे सुचना करणारे पत्र तत्कालीन जिल्हाधिकारी यांना लिखित स्वरूपात दिले होते त्या सुचना का स्विकारल्या नाही हा प्रश्न देखील विचारण्यात आला.
विकासाला आमचा विरोध नाही फक्त तो विकास प्रथा , परंपरा यांचे पालन करत वारकरी संप्रदाय व पंढरपूर नागरिक यांच्या मार्गदर्शनाखाली व्हावा.
वाराणसी व पंढरपूर तुलना करुन विकास आराखडा नको.
शासनाच्या 'विकास' नावाच्या मुलाला आमच्या मंदिर परिसरातील 'भुमी' नावाची मुलगी पसंत पडली...तुम्ही लग्नाची मागणी घातली परंतू आम्ही नकार दिला....तरीही तुम्ही सध्या फक्त मोबदला दृष्टीने बोला असे म्हणता ते म्हणजे लग्नच ठरले नाही... हुंडा,किती रुखवतात काय काय घ्यायचं अशी तयारी शासनाची दिसते.
पंढरपुरची मुळ रचना , संस्कृती कायम ठेवून विकास आराखडा मांडला जावा.
असा विकास आराखडा तयार करण्यासाठी वारकरी संप्रदाय, पंढरपुरचे नागरिक, लोकप्रतिनिधी, प्रशासकिय अधिकारी यांचा समावेश असणारी एक 'पंढरपूर विकास आराखडा अभ्यास समिती ' नेमावी व पंढरपूर चा विकास आराखडा नव्याने तयार करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी आग्रही मागणी लिखीत मौखिक स्वरूपात सर्वांनी केली.
बचाव समिती पदाधिकारी यांनी बडवे ,उत्पात सेवेधारी यांच्या वर झालेला अन्याय मंदिर परिसरातील नागरिकांनी या अगोदर दिलेले बलिदान याची आठवण करून दिली. मोकळ्या पडलेल्या शासकीय जागांवर काॅरीडाॅर सारखे प्रकल्प राबवावे लोकांची घरेदारे पाडू नये तुम्ही दिलेला मोबदला आमच्या पासंगालाही पुरणार नाही अशा भावना व्यक्त केल्या.
यावेळी कॉरिडॉर विरोधी कृती समिती अध्यक्ष अभयसिंह इचगावकर, रामकृष्ण महाराज वीर,
चैतन्य महाराज देगलूरकर, तुकाराम चिंचणीकर, गणेश लंके, भागवत चवरे महाराज, अँड सुधीर रानडे, दत्तात्रय (नाना)कवठेकर, व्यंकटेश कुलकर्णी, गणेश बडवे, डॉ सचिन लादे , कौस्तुभ गुंडेवार, अभय कुलकर्णी, मदन महाराज हरिदास, माजी नगरसेवक ऋषिकेश उत्पात आदी उपस्थित होते.
चौकट.
केबिपी कॉलेज मध्ये झालेल्या बैठकीत श्री पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव कृती समिती व सकल वारकरी संप्रदाय यांच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना अभ्यास कृती समिती नेमण्यासाठी निवेदन देण्यात आले.
यापूर्वी वारकरी संप्रदाय यांच्या वतीने एक आराखडा दिला होता त्याचे काय झाले? असा सवाल करण्यात आला.
शासनाचे अधिकारी शहरातील जुने जाणते
नागरिक यांची पंढरपूर विकास आराखडा अभ्यास कृती समिती नियुक्त करा याद्वारेच तोडगा निघू शकतो. असे आवाहन करण्यात आले.
संपादक.
चैतन्य उत्पात
.

Comments
Post a Comment