वारी कालावधीत भाविकांना ईतर सोयी सुविधा सह जलद व सुलभ दर्शन vhave- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद.


 वारी कालावधीत भाविकांना सोयी-सुविधांसह

सुलभ व जलद दर्शनाबाबत नियोजन करावे

                                                                  जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद



          पंढरपूर, (प्रतिनिधी )कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. कार्तिकी शुध्द एकादशी गुरूवार, दिनांक २३नोव्हेंबर, २०२३ रोजी असून, यात्रा कालावधी दि.१४ ते २७ नोव्हेंबर असा राहणार आहे. या कालावधीत यात्रा सुमारे ८ ते १० लाख भाविक येतात. येणाऱ्या वारकरी, भाविकांना आवश्यक सोयी सुविधां बरोबरच सुलभ व जलद दर्शन  व्हावे यासाठी  योग्य नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या.

                  कार्तिकी यात्रा नियोजनाबाबत शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस प्रांताधिकारी गजानन गुरव, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, मोहोळचे प्रांताधिकारी. अजिंक्य घोडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अर्जुन भोसले, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, गटविकरस अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव,कार्यकारी अभियंता अमित निंबकर, महाविरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता भिकाजी भोळे, तालुका आरोग्य डॉ. एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ. जयश्री  ढवळे, तसेच संबधित विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.

            यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले,  यात्रा कालावधीत नगरपालिका, पोलीस प्रशासन, महसूल तसेच मंदीर समिती यांची महत्वाची भुमिका असून, या कालावधीत  नगरपालिकेने स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा मुबलक पाणी पुरवठा करावा, वाळवंटाचीस्वच्छता व पुरेशा प्रकाश राहिल याबाबत नियोजन करावे तसेच अतिक्रमणे काढावीत, बोअरवेल व हातपंप पाण्याची तपासणी करावी. मंदीर समितीने व नगरपालिकेने प्रदक्षिणा मार्ग, नदीपात्रात आवश्यक ठिकाणी बॅरकेंटींग करावे व अग्निशामक यंत्रणा कार्यरत ठेवावी . नदी पात्रात वाहने येऊ नयेत यासाठी बॅरेकेटींग करावे. सुलभ शौचालयाचा ठिकाणी मुबलक पाणी व्यवस्था करावी. वाहनतळाची जादा व्यवस्था करावी. तसेच मोफत वाहनतळ व्यवस्थेबाबत ठळक फलक लावावेत. अन्न औषध प्रशासन विभागाने मठात शिजविण्यात येणाऱ्या अन्नाची तसेच शहरातील हॉटेलची वेळोवेळी तपासणी करावी. शहरात वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने नियोजन करावे. तसेच एस.टी. महामंडळाने एस.टी बसेस मध्यवर्ती स्थानकात येणार नाही याबाबत कार्यवाही करावी. 

कार्तिकी यात्रा कालावधीत दर्शन रांगेतील भाविकांसाठी जादाचे विश्राती कक्ष उभारावेत. दर्शनरांगेत व दर्शन मंडपात भाविकांना स्वच्छ पिण्याच्या व्यवस्था करावी. दर्शन रांगेत घुसखोरी होणार नाही यासाठी मंदीर समिती व पोलीस प्रशासनाने  अवाश्यक उपाययोजना कराव्यात. यासाठी जादा सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी. स्काय वॉक  व दर्शन रांगेत आपत्‍कालिन मार्गाची करण्यात येणाऱ्या व्यवस्थेबाबत तात्काळ नियोजन करावे. स्काय वॉकचे स्ट्रक्चर ऑडीट करुन घ्यावे. कार्तिकी यात्रा कालावधीत चंद्रभागा नदीपात्रात पाणी सोडण्याबाबत जलसंपदा विभागाने नियोजन करावे. आरोग्य विभागाने तज्ञ डॉक्टरांसह वैद्यकीय पथकाची नेमणूक करावी. तसेच फिरते वैद्यकीय पथक, मुबलक औषधसाठा उपलब्ध राहील याबाबत नियोजन करावे. अशा सूचनाही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या.

             यावेळी  प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी प्रशासनाकडून भाविकांसाठी देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची माहिती दिली. तसेच मंदीर समितीकडून  कार्तिक यात्रा कालावधीत वारकरी भाविकांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची माहिती दिली. तर उपविभागीय अधिकारी यांनी  पोलीस प्रशासनाकडून वारकरी भाविकांच्या सुरक्षेबाबत व शहरात वाहतुक कोंडी होऊ नये याबाबत करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली.

                 तत्पुर्वी  जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मंदीर, मंदीर परिसर, मुखदर्शन व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणा,दर्शन मंडप, दर्शनरांग, पत्राशेडची, विष्णूपद बंधारा, घाट, चंद्रभागा वाळवंट तसेच ६५ एकर  या ठिकाणची   पाहणी करुन वारकरी भाविकांना आवश्यक सुविधा पुरविण्याबातच्या सूचना त्यांनी संबधित अधिकारी यांना केल्या.

संपादक.

चैतन्य उत्पात.

मो.९४०३८७३५२३.

९२२६२८२००५.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.