Posts

Showing posts from July, 2023

अभिजीत पाटील यांच्यावर पुष्पवृष्टी.

Image
 *खुपसुंगी येथे जेसीबीतून पुष्पवृष्टी करून केले अभिजीत पाटलांचे स्वागत*  पंढरपूर (प्रतिनिधी) श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांचा सध्या मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावोगावी खेडोपाडी जाऊन भेटीगाठी व लोकसंपर्क करत असताना दिसत आहेत... आज दिनांक २९जुलै रोजी हिंदू-मुस्लीमाचा पवित्र असणारा मोहरम सणानिमित्त खूपसुंगी येथे श्री विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी भेट दिली असता गावकऱ्यांनी मोठ्या जल्लोषात जेसीबीतून पुष्पवृष्टी करून व हलगीच्या जल्लोषात अभिजीत पाटलांचे स्वागत केले... सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अभिजीत पाटील हे मोठ्या लोकसंपर्कात असून गावोगावी कार्यक्रमात प्रत्येकाच्या सुखदुःखात पाटील हे उपस्थित राहत असताना दिसत आहेत... येत्या विधानसभेच्या तयारीत पाटील यांनी चांगलीच तयारीत असल्याचे तालुक्यात बोलले जात आहे.. चैतन्य उत्पात.

आ. समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून दोन रुग्णांना प्रत्येकी १ लाख रुपये.

Image
 आ.आवताडे यांच्या प्रयत्नांतून दोन रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी प्रत्येकी १लाखाची मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्य मदत. मंगळवेढा (प्रतिनिधी): पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रातील मंगळवेढा तालुक्यातील नामदेव आप्पा चौगुले व भक्ती सुरेश बोबलादे यांच्या अपघात आरटीए रोगावर  उपचारासाठी मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आरोग्य उपचारासाठी अर्थसहाय्य रूपामध्ये प्रत्येकी १लाखाची मदत संबंधित रुग्णांच्या बँक खात्यावर प्राप्त झाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, चौगुले यांच्यावर सिमेटस इनामदार मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल पुणे येथे व बोबलादे यांच्यावर समर्थ हॉस्पिटल मिरज येथे उपचार सुरू आहेत. परंतु या रुग्णांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने सदर आजारावर उपचार करण्यासाठी मुख्यमंत्री आर्थिक सहाय्यता निधीतून मदत मिळवून देण्यासाठी या परिवारातील सदस्यांनी आमदार समाधान आवताडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधला. आमदार आवताडे यांनीही दोन्ही रुग्णांच्या वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक सहाय्य करण्याच्या अनुषंगाने आपल्या कार्...